आज 10वी चा निकाल लागणार, निकाल येथे पहा

सध्या बारावीचा निकाल लागल्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता दहावीच्या निकालाकडे आहे. बरेच विद्यार्थी आणि त्यांचे पालक हा निकाल कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

इतर काही राज्यांनी आपले निकाल जाहीर केले आहेत. पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC बोर्ड) निकाल अजून लागलेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की, “आपला दहावीचा निकाल कधी लागणार?”

यावर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. राज्यभरातल्या २३,४९२ शाळांमधून मुलांनी या परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यामुळे आता सर्वांची नजर बोर्डाच्या घोषणा कडे आहे.

निकाल कधी लागेल?

बोर्डकडून सांगितले गेले आहे की, दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १३, १४ किंवा १५ तारखेला लागू शकतो. १२ मे ला गुरुपौर्णिमेची सुट्टी आहे आणि १३ तारखेला तयारीसाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे १४ किंवा १५ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे.

बोर्डाने अजून तारीख सांगितलेली नाही, पण असे म्हटले होते की “बारावीचा निकाल लागल्यानंतर साधारण १० दिवसांत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल.”

येथे क्लिक करून निकाल पहा : https://www.mahahsscboard.in

निकाल लागल्यावर काय होईल?

दहावीचा निकाल लागला की, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होईल. त्यामुळे निकाल लवकर लागणे गरजेचे आहे.

निकाल जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून त्यांच्या गुणांची माहिती ऑनलाईन पाहता येईल.

महत्त्वाची गोष्ट:
निकाल पाहण्यासाठी तुम्ही “10 वीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करू शकता (ही लिंक वेबसाईटवर दिली जाईल).

Leave a Comment